Header Ads Widget

अतिशय महत्त्वाची माहिती बर्याच लोकांना माहित नाही हा कायदा | Very important information most people do not know this law


अतिशय महत्त्वाची माहिती

 बर्याच लोकांना माहित नाही हा कायदा





अनेकदा आपल्याला हाफ मर्डर किंवा जिवेठार करण्याचा प्रयत्न केला असे असे शब्द ऐकायला मिळतात माञ यासंबंधी फारसे ज्ञान कोणाकडेच नसते तर मग बघुया काय आहेत हे प्रकार 

कधी एखादा ओळखीचा किंवा अनोळखी व्यक्ती जीवघेणा हल्ला करतो आणी सुदैवाने तो व्यक्ती त्या हल्यातुन वाचतो अशावेळी त्या व्यक्तीविरुध्द कोणती कारवाई करावी आणी त्याची सदरील इसमाला काय सजा मिळेल सविस्तर माहिती पाहुया आपले कायदे आपले अधिकार या ब्लाँगवर   
 
Indian Penal Code 1860 
sec 307

 

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 307 
हत्या करण्याचा प्रयत्न करणे

⃣  1 जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जिवेठार करण्याच्या हेतुने हल्ला करतो किंवा तसा प्रयत्न करतो किंवा त्याहेतूने काहि कृत्य करतो ज्यामुळे समोरिल व्यक्तीचा मृत्यू घडुन येईल किंवा मृत्यूचे कारण होईल असे कृत्य या कलमांन्वये अपराध मानला जाईल 
असे कृत्य खुन केल्यासारखेच मानले जाते

यासाठी १० वर्ष कारावासाची शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे
हा अजामीनपाञ अपराध आहे

⃣  २ - अनेक केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीने अन्य व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला व त्यातुन तो व्यक्ती वाचतो माञ त्याला गंभीर दुखापत होते अशावेळी अपराध्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा किंवा कमीतकमी १० वर्ष कारावासाची शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे
हा अपराध अजामीनपाञ अपराध आहे

⃣   3 एखादा  अपराधी जो आधिच एखाद्या गुन्ह्यासाठी अपराधी असुन सजा भोगत असेल आणी अशा अपराध्याने तुरुंगात किंवा इतरत्र ठिकाणी अन्य व्यक्तीवर केलेला जिवघेणा हल्ला या कलमान्वये अपराध मानला जाईल व असे कृत्य करणाऱ्या  अपराध्यास जन्मठेप अथवा
मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल असे प्रावधान करण्यात आले आहे

Indian Penal Code 1860
 Sec 325

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 325

एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला केला  कि त्याला गंभीर दुखापत झाली असेल परंतु त्या व्यक्तीला ठार करण्याचा हेतू नाही तर अशा परिस्थितीत दोषीला कलम 307 ऐवजी भारतीय दंड संहिताने घ्यावी. भारतीय दंड संहितेच्या कलम 325 ( Indian Penal Code 1860 Sec 325) नुसार शिक्षा ठोठावली जाते.


IPC 307 हा गुन्हा अजामिनपाञ असुन या गुन्ह्यात जामिन मिळणे फारच कठीण असते या केसेसमध्ये पोलिस स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकारचा जामिन मिळणे शक्य नाही 
जामिनासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करावी लागते तिथे जामिन नामंजुर झाल्यास उच्च न्यायालयात अपील करावे लागते




                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या