Header Ads Widget

आवश्य पहा हि माहिती सातबारा, ८ अ मध्ये अशी चुकी आहे का | Are there mistakes in Satbara, 8A

तुमच्या सातबारा, ८ अ मध्ये चुका आहेत का | Are there mistakes in your Satbara, 8A





शेतकऱ्यांना तात्काळ 7/12 व 8 अ उतारा मिळणेकामी संगणक प्रणालीचा वापर करून ऑनलाइन ७/१२ देण्याचा यशस्वी उपक्रम राबवला आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तलाठी यांचे हस्तलिखित सातबारा ऑनलाइन करण्यात आले त्यामुळे काही शेतकऱ्यांची नावात चुक झाली तर काही  शेतकऱ्यांच्या नावे कब्जेदार सदरी शेतजमीन क्षेत्र चुकीचे आहे. सातबारामधील आणेवारी ही ऑनलाइन सातबारावर हेक्टर व आरमध्ये घेताना चुका झाल्याने सातबाराचा मेळ बसत नाही. त्यामुळे क्षेत्र कमी जास्त झाल्याने खातेदार शेतकऱ्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. महसूलच्या चुकीच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.




हस्तलिखित सातबारा लिहताना हस्तदोषाने चुका झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 चे कलम 155 अन्वये चूक दुरूस्ती करण्याचा आदेश तहसील त्यांच्या स्तरावर काढतात. याकामी संबंधित शेतकऱ्यांनी तालुका तहसील कार्यालयात 155 अन्वये अर्ज दाखल करावयाचा असतो. तलाठ्यांनी केलेली चूक ही ज्यावर्षी केली आहे. त्याअगोदरील वर्षातील व चुकीच्या नंतर सर्व 7/12 व सर्व फेरफार सादर करावयाचे असता

संबंधित गावकामगार  तलाठी यांनी 155 नुसार चुक दुरुस्तीकामी सदरचा अहवाल ऑनलाइन प्रणालीद्वारेच संबंधित तालुक्याचे मा. तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवायचा असतो तहसीलदारांनी त्यासंबंधित पञ  तलाठी यांना ऑनलाइन द्यावयाचे आहे. त्या प्रिंटवर तलाठी यांनी संबंधित  तालुका तहसीलदार यांचा सही शिक्का घ्यावयाचा असतो. प्रस्तुतच्या 155 चे आदेशाची अंमलबजावणी फक्त एकाच दिवसात करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.
https://www.aaplekayde.com/



सातबारा व ८ अ च्या कोणत्या चुका दुरुस्ती करता येतात | What are the mistakes of Satbara and 8A Can be repaired | महाराष्ट्रातील 7/12 वर मी माझे नाव कसे बदलू शकतो | How can I change my name in 7 12 Maharashtra |        How can I change my name in Utara |     How can I change my name in 7 12 in Maharashtra





  • महसूल दप्तरी एखादी लेखनिक चूक झालेली असेल म्हणजे तलाठी कारकून अन्य अधिकार्‍यांकडून लिहीताना चूक झाली असेल 
  • जसे चूकीचा सर्वे नंबर चूकीचा हिस्सा नंबर चूकीचा पोट हिस्सा नंबर चूकिचे क्षेत्र 
  • जमिनीत अनेक हिस्सेदार असतात अशावेळी फेरफार उतारा सातबारा आठ अ उतारा यावर लिहीताना आपसात उलट सुलट अनवधानाने चूकीचे लिहीले गेले असेल


सातबारा ८ अ च्या चुक दुरुस्तीच्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे | Correction of mistakes of Satbara 8A Documents to be attached with the application

1.  संबंधित शेतकऱ्याने आपल्या तालुक्यातील तहसिलदारांकडे अर्ज सादर करावयाचा आहे
2.  अर्ज करतांना अर्जावर मा. तहसिलदार सो यांचेकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये अर्ज असा उल्लेख करावा
3.  अर्जासोबत तलाठ्याकडुन चुक झाल्याच्या आधीचे सातबारा उतारा व ८ अ चे उतारे जोडावे
4.  अर्जासोबत सर्व फेरफार नोंदि जोडणे आवश्यक आहे.
5. अर्जासोबत झालेल्या खरेदिखत झालेले असल्यास त्याच्या प्रती जोडणे आवश्यक आहे
6.  अर्जासोबत सध्याचा तिन महिने आतिल उतारा जोडणे आवश्यक असते

सातबारा ८ अ वरील चुक दुरुस्तीची प्रक्रिया | 
Error correction procedure on Satbara 8A

  • याकामी तहसील कार्यालय संबधित तलाठ्यांकडून स्वंयस्पष्ठ अहवाल मागवतात. 
  • सर्व संबंधित मालकांना / हिस्सेदारांना नोटीस बजावली जाऊन सुनावणी घेण्यात येते व सुनावनीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते
  • तहसीलदार महसूल दप्तर तपासून घेतात
  • त्यानंतर प्रस्तुतप्रकरणी टिपणी मंजूर केली जाते. व त्यानंतर चूक दुरुस्तीचा आदेश पारित केला जातो. प्रस्तुतच्या आदेशाची तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाते. 
चूक दुरूस्ती होणेसाठी फक्त 45 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. माञ काहि प्रकरणे गुंतागुंतीची असल्याने 
त्यात सुनावणी घेणे आवश्यक असते त्यामुळे हि सर्व प्रक्रिया होणेसाठी एक वर्षापर्यंतचा कालावधी लागु शकतो



सातबारा ८ अ वरील चुका दुरुस्ती करण्याचा अधिकार  कोणाकोणाला असतो | To correct the above errors in Satbara 8a Anyone has rights

  • 7/12 वरील चुका दुरुस्त करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत
  • माञ यासंबंधीचे जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार कामकाजाच्या सोयीसाठी तहसीलदार यांना दिलेले असतात
  • त्यामुळे अशा प्रकारची लेखी तक्रार तहसीलदार यांच्याकडे करावयाची असते
या विशेष अधिकाराचा वापर करून तहसीलदार निकाल देतात


त्यामुळे यासंबधी अधिकार मे. तहसिलदार सो. यांना असुन आपल्या सातबारा किंवा ८ अ मध्ये काहि चुका अथवा तफावत असल्यास आपणही सदरची प्रक्रिया अवलंबून आपला सातबारा दुरुस्त करुन घ्यावा. 
माञ यासंबंधी अर्ज करतांना किंवा सुनावणी करतांना  वकीलांचा सल्ला घ्यावा कारण बर्याचवेळा तहसिलदार आर टि एस दावा दाखल करण्याचे निर्देश देऊ शकतात त्यामुळे सदर दावा दाखल करतांना वकिलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
 

 प्रश्नावली
 
 
 
 How can I go 7 12 online in Maharashtra |
मी महाराष्ट्रात 7/ 12 ऑनलाइन कसे शोधु शकतो | How can I check my Satbara in Maharashtra | मी महाराष्ट्रात माझा सातबारा कसा तपासू शकतो

 महाराष्ट्रातील महाभूलेख वर 7/12 उतारा व ८ अ मिळविण्यासाठी खालील  पध्दतीचे अनुसरण करा | To get a 7/12 utara document on MahaBhulekh in Maharashtra, follow these steps


 
 
  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी डिजिटल सातबारा मिळवण्यासाठी  खालील वेबसाईटवर जाऊन आपण सातबारा पाहू शकता किंवा सातबारा डाऊनलोड करू शकता https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr.
 
  •  महाभूलेख च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  •   ओपन झालेल्या विंडोमध्ये जिल्हा नंतर तालुकाव गाव निवडा.
  •  आपला गट नं आथवा सर्वे नं प्रविष्ट करा.
  • त्यानंतर "तपशील मिळवा" वर क्लिक करा
  •  व नंतर लागू शुल्क भरा.
 8A चा उतारा किंवा सातबारा उतारा  डाउनलोड करून घ्या

 

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील शेतीचा नावाने सातबारा कसा शोधायचा | How to search Satbara by name


 7/12 ऑनलाइन मिळविण्यासाठी पायऱ्या
  • वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन एक नवीन पेज उघडेल.
  • नवीन उघडलेल्या पेजवर आपला विभाग निवडा  व क्लिक करा: ...
  • आता विंडोमध्ये जिल्हा निवडण्याचा पर्याय दिसेल त्यात जिल्हा निवडा  
  • त्यानंतर विंडोमध्ये तालुका व गाव निवडा 
  • आता तुम्हाला गट नंबर सर्वे नंबर किंवा नावानुसार  सातबारा निवडण्याची ऑप्शन दिसेल आडनाव समोरील गोलावर क्लिक करा
  •  त्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.

हे पुस्तक आम्हाला महसूलविषयक कायदे, स्वतःच्या वारसाहक्काचा त्याग, दत्तक कायदे, पोटगी, हिंदू विवाह, जमिनीचे विखंडन/एकीकरण, आदिवासींच्या जमिनी आणि कृषी कर्ज आणि इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देते.आजच खरेदि करा

 

 मी महाराष्ट्रात माझे नाव ऑनलाइन 7 12 मध्ये कसे जोडू शकतो | How can I add my name in 7 12 online in Maharashtra?

तुमच्याकडे सदर संपत्तीचे वारसा हक्क पत्र खरेदी खत किंवा बक्षीस पत्र अथवा अन्य कागदपत्रे असतील तर तुम्ही गाव कामगार तलाठी यांना अभिलेखात नाव समाविष्ट करण्याचा अर्ज करुन  तलाठी अर्जावर प्रक्रिया करून नोंदवहीत  नोंद करून
 त्यानंतर तलाठी चावडीवरील नोंदीची प्रत अद्ययावत करेल व आपले नाव सातबारा सदरी दाखल करेल

 सातबारावरून माझे नाव कसे काढायचे | How do I remove my name from Satbara | मी माझे नाव कसे काढू शकतो | How can I remove my name

  आपण सदर सातबारा वरील क्षेत्र एखाद्या व्यक्तीच्या लाभात खरेदीखत  हक्क सोड पत्र बक्षीस पत्र लिहून देतो किंवा एखाद्या संपत्तीचा हक्क सोडून त्यानंतरच आपले नाव सातबारा वरून कमी होते त्यासाठी सदर प्रक्रिया करणे आवश्यक असते त्यामुळे तुम्ही सातबारा सदरावरील तुमचे नाव कमी करण्यासाठी तलाठी तहसीलदार कार्यालयात स्वतः संपर्क साधू शकता किंवा या कामी वकिलांचे मदत घेऊ शकता
 
 
 
  
कायदा शेतकर्‍यांच्या हिताचा असला तरी प्रत्यक्षात ते या ‘सामान्यत: कायद्यां’बाबत बरेचसे अनभिज्ञ आहेत. यामुळे सरकारी नोकरशाहीला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण करण्यास मदत होते. कायद्याबद्दल स्वतःला शिक्षित करून शेतकरी सरकारी नोकरशहांकडून होणार्‍या गैरवर्तनाला सहज आळा घालू शकतात जमिनी खरेदी करण्याबाबतचा कायदा, औद्योगिक कारणासाठी शेतजमिनीची विक्री, ७/१२ उतारा कसा वाचावा, भूसंपादन कायदे, कुल कायदा (बॉम्बे टेनन्सी आणि कृषी कायदा 1948) या पुस्तकात ही सर्व माहिती या पुस्तकात दिली आहे.
 
 
 
 
         मी माझ्या वडिलांचे नाव कसे हटवू शकतो
        
How can I delete my father name 
         
         तुम्हाला प्रत्येक कागदपत्रांमधून तुमच्या वडिलांचे नाव काढून टाकायचे आहे  त्यासाठी तुम्ही न्यायालयात दावा दाखल करून तुम्ही दिवाणी न्यायालयासमोर घोषणापत्र  करावयाचे असते आणि म्हणून तुम्ही दाव्यात असे घोषित करू शकता की तुम्हाला तुमचे पालकांशी वडिलांशी नाते ठेवायचे नाही आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव काढून टाकायचे आहे.  त्यानंतर कोर्ट तुम्हाला अशी परमिशन देऊ शकते 


 
 
         ८ अ उतारा म्हणजे काय  |  What is 8A Utara

         8A चा उतारा एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे ज्यामध्ये एकाच मालकाच्या सर्व मालमत्तांचा तपशील दिला जातो जसे की त्याचे स्थान, तालुका, जिल्हा, विविध गटातील एकुण क्षेत्र,  मालक तपशील आणि बरेच काही समाविष्ट आहे.  मालमत्ता किंवा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी, भविष्यात कोणताही त्रास टाळण्यासाठी अशा कागदपत्रांची कायदेशीर तज्ञांकडून पडताळणी करणे आवश्यक आहे. 
 
 
 
 
 
सदर कायद्याच्या अधिक तरतुदी व माहितीसाठी सदर पुस्तकाचा आधार घ्यावा संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882 या पुस्तकात संपत्ती हस्तांतरणाविषयी सविस्तर व उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. आजच खरेदि करा 
पुस्तकावर क्लिक करा व घरपोहच मिळवा 
किंमत फक्त 60/- रुपये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या